Home क्राईम पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; चार जणांवर गुन्हा

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ; चार जणांवर गुन्हा


vivahitecha chad

जळगाव प्रतिनिधी । माहेरहुन पाच लाख रूपये आणावे यासाठी पिंप्राळा येथील माहेर आणि अडावद येथील सासर असलेल्या विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी पतीसह इतर तिघांवर रामानंद नगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, वैशाली सिध्दार्थ सैंदाणे (वय-27) रा. कमळगाव रोड, इंदिरा नगर, अडावद ता.चोपडा ह.मु. पिंप्राळा जळगाव यांचे अडावद येथील सिध्दार्थ भावसिंग सैंदाणे यांच्याशी 29 डिसेंबर 2011 रोजी विवाह झाला होता. सुरूवातीचे तीन-चार वर्षे संसार व्यवस्थित चालला होता. मात्र सासू नेहमी टोमणे मारते. पतीने सांगितले की तु मला आवडत नाही. तसेच नांदायचे असेल तर माहेरहून पाच लाख रूपये घेवून येत नाहीतर मला घटस्फोट दे अशी धमकी देत मारहाण व शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी नंणंद आणि नंदोई यांनी देखील शिवीगाळ व मारहाण केली. 29 ऑगस्ट 2018 रोजी मला मारहाण करत माहेरी हाकलून लावले. मारहाण आणि शिवीगाळ हे असह्य झाल्याने ती माहेरी आली. सर्व हकीकत आईवडीलांना सांगितल्या. वैशाली सैदाणे फिर्यादीवरून रामानंद पोलीस स्टेशनला पती सिध्दार्थ भावसिंग सैंदाणे, सासू सुशीलाबाई भावसिंग सैदाणे, नणंद सुरेखा समाधान सोनवणे, नंदोई समाधान खंडू सोनवणे रा.श्रध्दा कॉलनी जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound