Home Cities जळगाव राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षकपदी डॉ. विठ्ठल भुकन

राज्य उत्पादन शुल्क जिल्हा अधीक्षकपदी डॉ. विठ्ठल भुकन

0
65

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जळगाव राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक सीमा झावरे यांची अकोला येथे बदली झाली आहे. त्यांच्या जागी डॉ. विठ्ठल तुकाराम भुकन हे अधीक्षक म्हणून येत आहे.

राज्याच्या गृह विभागाने राज्य उत्पादन शुल्काच्या पाच अधीक्षकांच्या बदलीचे आदेश पारित केले असून त्यात जळगावच्या अधिक्षक सीमा झावरे यांची बदली अकोला येथे करण्यात आलेली आहे. तर त्यांच्या जागी डॉ. विठ्ठल तुकाराम भुकन हे सातारा येथून जळगावला अधीक्षक म्हणून येत आहे.

गृहविभागाने पारित केलेल्या बदलीच्या ठिकाणी अधिकार्‍यांना तत्काळ पदावर रुजू होण्यास निर्देषीत केले आहे. अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने गृह विभागाने आदेश काढले आहे. यामुळे डॉ. भुकन हे लागलीच कार्यभार सांभाळणार असल्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound