Home Cities यावल पंचायत राज समितीची धनाजी नाना महाविद्यालयास भेट

पंचायत राज समितीची धनाजी नाना महाविद्यालयास भेट

0
21

फैजपूर प्रतिनिधी ।  जळगाव जिल्हा दौऱ्यावर सोमवारपासून पंचायत राज समिती दाखल झाली असून आज मंगळवारी धनाजी नाना महाविद्यालयात दुपारी भेट देऊन स्मृतिस्थळास अभिवादन केले.

आज मंगळवारी विविध तालुक्यात भेटी असल्याने पाल येथे जात असतांना ऐतिहासिक भूमी आलेली ज्या ठिकाणी काँग्रेस ग्रामीण पहिले अधिवेशन झाले. आ. शिरीष चौधरी यांनी सर्व माहिती देऊन त्यांचा सत्कार केला. या कमेटी मध्ये गटप्रमुख आ.अनिल पाटील, आ.माधवराव जवळगावकर व आ.डॉ देवराम होळी यांची उपस्थिती होती. ऐतिहासिक पावन भूमिती आमचे पाय लागले हे आमच्यासाठी भाग्यच असल्याचे कमेटीतील आमदारांनी सांगितले.  यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच लिलाधर चौधरी, डॉ. पी. आर. चौधरी, एन. ए. भंगाळे, किशोर चौधरी, एम.टी.फिरके, जि.प. सदस्य प्रभाकर सोनवणे, पं.स.सदस्य शेखर पाटील, योगेश सोपान पाटील, धनंजय शिरीष चौधरी,डॉ राजेंद्र पाटील , निळकंठ चौधरी उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound