चाळीसगावात डोंगरी नदीच्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तितूर व डोंगरी नदीला पूर आले आहे. यामुळे शहरातील तिघे पुल पाण्याखाली आल्याने डोंगरीवरील पुलाची उंची वाढवण्याची मागणी अमित दायमा यांनी एका निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगावात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने तितूर व डोंगरी नदीला पूर आले आहेत. यामुळे शहरातील तीन मुख्य पुल पाण्याखाली आले आहेत. परिणामी जुनी नगरपालिका ते रामवाडी पर्यंतच्या परिसरातील नागरिकांची गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांना वैद्यकीय उपचारासाठी किंवा जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीला जाण्यासाठी मार्गच बंद झाल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहे.

त्यामुळे चाळीसगाव शहरातील डोंगरी नदीवरील दयानंद हॉटेल ते सदानंद हॉटेल दरम्यान असलेल्या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अमित दुर्गाप्रसाद दायमा (रा. आडवा बाजार, ता. चाळीसगाव) यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, खासदार उन्मेष पाटील, आमदार मंगेश चव्हाण, नगराध्यक्षा आशालता चव्हाण व मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्याकडे  केली आहे. आपल्या मागणीची तातडीने दखल घेऊन या पुलाची उंची वाढविण्यात यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

 

 

 

 

Protected Content