जळगाव (प्रतिनिधी) माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे चिरंजीव विशाल देवकर यांना जळगाव ग्रामीण मतदार संघातून उमेदवारी जाहीर झाल्याची पोस्ट देवकर आप्पा यांचे पीए दीपक पाटील यांनी केल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.
माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचे पीए दीपक पाटील यांनी आज दुपारी जळगाव राष्ट्रवादी ग्रुपमध्ये टाकलेल्या पोस्ट म्हटले आहे की, जळगाव ग्रामीण मतदार संघात राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवारी विशालदादा देवकर यांना जाहीर झाली आहे. त्यानिमित्त राजकारणाची रणनीती आखण्यासाठी जळगाव व धरणगाव तालुक्याचे सर्व तालुका अध्यक्ष यांची तातडीने मीटिंग घेण्यात आली. यावेळी जळगाव तालुका अध्यक्ष बापू परदेशी, धरणगावचे तालुका अध्यक्ष धनराज माळी, कि.से. तालुका अध्यक्ष ईश्वर पाटील, आव्हाणे (लालासर ),युवक अध्यक्ष विनायक चव्हाण, नाटेश्वर पवार, ओबीसी सेल अध्यक्ष मधुकर चव्हाण, आमोदयाचे सरपंच नवलभाऊ पाटील, विटनेरचे माजी सरपंच संदीप ठोंबरे, निंबा गोलांडे, अल्पसंख्यांक अध्यक्ष बापू पिंजारी, ओबीसी सेलचे अर्जुन पवार, डॉक्टर सेल अध्यक्ष सुधाकर पाटील, सामाजिक न्याय विभाग तालुकाध्यक्ष कालिदास सपकाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या संदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी पोस्ट टाकल्याचे मान्य केले आहे. तर विशाल देवकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे या पोस्ट मागील नेमके सत्य काय? हे स्पष्ट होऊ शकले नाही. दरम्यान, पोस्ट सोबत त्यांनी काही फोटो देखील टाकले आहेत.