Home राजकीय वीरेंद्र सहवाग करणार काँग्रेस उमेदवाराचा प्रचार

वीरेंद्र सहवाग करणार काँग्रेस उमेदवाराचा प्रचार


गुरूग्राम-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागही हरियाणा विधानसभा निवडणुकीत उतरला आहे. वीरेंद्र सेहवाग आता काँग्रेसच्या उमेदवारासाठी बॅटिंग करताना दिसत आहे. माहितीनुसार, वीरेंद्र सेहवागने तोशाम, भिवानी येथून निवडणूक लढवणारे काँग्रेस उमेदवार अनिरुद्ध चौधरी यांना पाठिंबा देत आपल्या इंस्टाग्राम पेजवर एक स्टेटस पोस्ट केला होता.


आता अनिरुद्ध चौधरी यांनी सांगितले की, माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग बुधवार, 2 ऑक्टोबर रोजी हरियाणातील तोशाम येथे जाहीर सभेला उपस्थित राहणार आहे. चौधरी म्हणाले, ही सभा तोशाम येथील ग्रेन मार्केटमध्ये दुपारी 12 वाजता होणार आहे. फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये, बीसीसीआयचे माजी कोषाध्यक्ष आणि हरियाणा क्रिकेट असोसिएशनचे सचिव यांनी लोकांना तोशाममधील बैठकीत उपस्थित राहण्याचे आवाहन केले. भारताचा माजी क्रिकेटपटू तोशाममध्ये अनिरुद्ध चौधरी यांच्यासाठी प्रचार करण्याची शक्यता आहे.


Protected Content

Play sound