Home क्रीडा विराट कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम ! सचिनचा विक्रम मोडत वनडेत शतकांचा नवा बादशहा

विराट कोहलीचा ऐतिहासिक पराक्रम ! सचिनचा विक्रम मोडत वनडेत शतकांचा नवा बादशहा

0
143

रांची-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । विराट कोहलीने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटप्रेमींच्या हृदयात आनंदाची लहर निर्माण केली आहे. रांचीच्या मैदानावर रंगलेल्या रोमांचक पहिल्या वनडे सामन्यात त्यानं विक्रमी शतक ठोकत क्रिकेटविश्वात आणखी एक सुवर्णाक्षरी कामगिरी नोंदवली. जागतिक क्रिकेटच्या इतिहासात ‘रनमशिन’ म्हणून ओळख मिळवलेल्या कोहलीने यावेळी थेट मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोठा विक्रम मोडीत काढत वनडेतील सर्वाधिक शतकांचा बादशहा म्हणून आपलं नाव कोरलं आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात कोहलीनं आपल्या वनडे कारकिर्दीतील ५२ वे शतक ठोकत इतिहास रचला. ३०७ व्या वनडे सामन्यातील २९५ व्या डावातच हे शतक झळकावत त्याने सचिनच्या ५१ शतकांच्या विक्रमावर नाव घेतली आघाडी स्पष्ट केली. सचिन तेंडुलकरने ४६३ सामन्यांच्या प्रदीर्घ वनडे प्रवासात ५१ शतकं केली होती. तीच संख्या विराटने लक्षणीय कमी सामन्यांत ओलांडत आपली फलंदाजीची सातत्यपूर्ण ताकद पुन्हा अधोरेखित केली.

या शतकासह कोहलीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शतकांची संख्या ८३ वर नेली आहे. त्यापैकी ५२ शतके वनडेत, ३० कसोटीत आणि एकमेव शतक टी-२० स्वरूपात केले आहे. क्रिकेटच्या इतिहासातील १०० शतकांचा विराट विक्रम अजूनही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्याच नावावर असून, तो मोडण्याची सर्वाधिक शक्यता असणारा एकमेव खेळाडू म्हणून कोहलीकडे पाहिलं जातं. मात्र सध्या कोहली फक्त वनडेत सक्रिय असल्याने हा विक्रम मोडला जाईल का, हा प्रश्न पुढील काळात अधिक रोमहर्षक ठरणार आहे.

वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांच्या यादीत पहिल्या पाचमध्ये तीन भारतीय खेळाडूंची उपस्थिती हा भारतीय फलंदाजीची ताकद अधोरेखित करणारा मुद्दा आहे. कोहली आणि तेंडुलकरनंतर रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याच्या नावावर ३३ शतकं आहेत. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग (३०) आणि श्रीलंकेचा सलामीवीर सनथ जयसूर्या (२८) यांनी स्थान मिळवले आहे. यादीचे शिखर मात्र आता कोहलीने अढळपणे काबीज केले आहे.


Protected Content

Play sound