पुण्यात विराट कोहलीचे शानदार शतक

 

virat kohli

पुणे प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने पुणे कसोटी सामन्यात शतकी खेळी करत भारताची बाजू मजबूत केली आहे. अजिंक्य रहाणेसोबत शतकी भागीदारी करताना विराटने कसोटी कारकिर्दीतले २६ वे शतक झळकावले. भारतीय मैदानावर विराट कोहलीची हे १२ वे तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ६९ वे शतक ठरले.

पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्याचा दुसरा दिवस आज विराटनं गाजवला. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या विराटनं चौफेर फटकेबाजी करत आज आपलं शतक पूर्ण केलं. १७३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केलं. त्यात १६ चौकारांचा समावेश होता. शतकानंतर अधिक आक्रमक खेळ करून त्यानं १५० धावांचा टप्पाही पार केला. भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्यानं ठोकलेलं हे नववं दीडशतक आहे. या दीडशतकासह त्यानं ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार व क्रिकेटविश्वातील सम्राट ब्रॅडमन यांचा सर्वाधिक दीड शतकांचा विक्रमही मोडित काढला. कर्णधार म्हणून ब्रॅडमन यांच्या नावावर नऊ दीडशतकं आहेत. त्यांच्यानंतर कसोटीत कर्णधार म्हणून सर्वाधिक दीडशतकं ठोकण्याचा मान मायकल क्लार्क, महेला जयवर्धने, ब्रायन लारा, ग्रॅहम स्मिथ यांच्या नावावर आहेत. या चौघांनीही प्रत्येकी सात दीडशतकं झळकावली आहेत.

Protected Content