जळगाव राहूल शिरसाळे । उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थी हिताच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकार्यांना परवानगी न दिल्याच्या निषेधार्थ विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या आवारात आंदोलन करण्यात आले.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे पत्रकार परिषद आटोपल्यानंतर आपल्या ताफ्यासह रवाना होत असतांना अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या माणसाने धक्काबुक्की केल्याचा आरोप पधाधिकाऱ्यांनी केला. गेल्या दिड तासांपासून पावसांत उभे करून ठेवले आहे. इतर संघटनांकडून मंत्री सावंत यांनी निवेदन स्वीकारले मात्र, अखील भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना भेट नाकारल्याचा आरोप करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ठिय्या आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी आमचे मास्क काढून घेतले, आम्हाला धक्काबुक्की केला आहे. पळपुटे शिक्षण मंत्री उदय सावंत यांची अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रितसर ५ मिनिटे भेट मागितली होती. मात्र, त्यांनी दोन तास विद्यापीठाच्या बाहेर उभे करून ठेवले होते असा आरोप केला. शिक्षण मंत्र्यांची गाडी आडवत असतांना पोलिसांकडून अटकाव न होता शिक्षण मंत्र्यांच्या पंटराकडून मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/367917044370933