Home क्राईम बलात्कारप्रकरणी काश्मीरमध्ये हिंसाचार : ४७ जवान जखमी

बलात्कारप्रकरणी काश्मीरमध्ये हिंसाचार : ४७ जवान जखमी


Rape Child crime

जम्मू-काश्मीर (वृत्तसंस्था) बांदीपोरा बलात्कार प्रकरणानंतर काश्मीरमध्ये जबरदस्त हिंसाचार उसळला आहे. ठिकठिकाणी सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली असून सुरक्षादलाचे ४७ जवान यात जखमी झाले आहेत. आरोपीला फाशीचीच शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी जोर धरते आहे.

 

बांदीपोरा येथे दोन दिवसांपूर्वी तीन वर्षांच्या मुलीवर एका तरुणाने पाशवी बलात्कार केला. टॉफीचे आमिष दाखवून हा तरुण पीडित मुलीला स्थानिक शाळेमध्ये घेऊन गेला. शाळेच्या टॉयलेटमध्ये नेऊन त्याने या चिमुरडीवर बलात्कार केला. दरम्यान काही वेळ गेल्यावर सगळे मुलीला शोधायला लागले. तेव्हा शाळेतून तिच्या किंकाळीचा आवाज आला आणि गावकरी शाळेत धावले. गावकऱ्यांना पाहून आरोपीने पळून जाण्याचा निष्फळ प्रयत्नही केला.

या घटनेनंतर काश्मीरमध्ये संतापाची लाट उसळली. अनेक ठिकाणी कडक बंद पाळण्यात आला. मुली या काही खेळणं नाही, अशा आशयाचे बॅनर्स झळकावण्यात आले. पोलिसांनीही हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार असल्याची माहिती दिली आहे. बारामुल्ला, बांदीपोरा, कुपवाडा, श्रीनगर, गांदरबल आणि अनंतनाग येथे अजूनही हिंसाचार सुरू आहे. स्थानिक शिक्षण संस्था काही वेळासाठी बंद करण्यात आल्या आहेत. आरोपीचे वय लपवल्याप्रकरणी संबंधित शाळेच्या प्राचार्यालाही जेरबंद करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound