जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरातील एका भागात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेवर जबरी अत्याचार केला. याबाबत कुणाला काही सांगितले तर पतीसह मुलांना जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक प्रकार २० जुलै रोजी रात्री ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा येथील एका भागात ३० वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. याच परिसरात राहणाऱ्यास नुर मोहम्मद शेख लतिफ (वय ४०) याने २० जुलै राोजी रात्री ११ वाजता महिलेच्या घरी येवून माझ्या विरोधात तक्रार करते असे बोलून तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कुणाला सांगितला तर पतीसह मुलांना जीवेठार मारण्याची धमकी दिली. याबाबत महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १ वाजता संशयित आरोपी नुर मोहम्मद शेख लतिफ याच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा ददाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कैलास दामोदर हे करीत आहे.