काँग्रेस सहकार विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी विनोदकुमार पाटील यांची नियुक्ती

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा जिल्हा बँकेचे संचालक विनोदकुमार पंडितराव पाटील यांची काँग्रेस पक्षाच्या सहकार विभागाच्या जळगाव जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मुंबई येथे पक्ष कार्यालयात झालेल्या एका विशेष कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या संमतीने सहकार विभागाच्या प्रदेशाध्यक्षा अँड. शुभांगी शेरेकर यांनी जेष्ठ नेते भाई जगताप यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र देण्यात आले.

 

जिल्ह्यातील सहकार महर्षी स्व. पंडितराव धर्मा पाटील यांचा सहकारातील वारसा यशस्वीरित्या चालवणारे विनोदकुमार पंडितराव पाटील यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती, यावल चे संचालक, शेतकरी सहकारी संघ, यावलचे व्हाइस चेअरमन, किनगाव विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, सध्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अशा ठिकाणी सातत्याने केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन ही नियुक्ती करण्यात येत असल्याचे याप्रसंगी मान्यवरांनी सांगितले. विनोदकुमार पंडितराव पाटील हे केवळ सहकार क्षेत्रातच नाही तर यशस्वी व्यावसायिक असून संगीतम ट्रॅव्हल्स चे संचालक आहेत. या नियुक्तीबद्दल विनोदकुमार पंडितराव पाटील यांना सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार, नातेवाईक आदिंनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content