जळगाव, प्रतिनिधी | मागील अनेक वर्षापासून जळगाव जिल्ह्यामध्ये धर्मरथ फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, पर्यावरण व वैदयकीय क्षेत्रात सातत्याने प्रामाणिकपणे काम करणारे नेतृत्व विनायक पाटील यांची संभाजी सेना जळगाव जिल्हाध्यक्ष निवड करण्यात आली.
विनायक पाटील यांची जळगाव जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. संभाजी सेना संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण बापू शिरसाठ, जनार्दन कोळी, गणेश महाजन, संतोष तायडे, नरेश शिंदे, गजानन पाटील, राहुल शेवाळे, अजीज शेख यांनी अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंद होत आहे.