Home Cities अमळनेर अमळनेरातील प्रसिद्ध डॉक्टर विनय भट यांची आत्महत्या

अमळनेरातील प्रसिद्ध डॉक्टर विनय भट यांची आत्महत्या


galfas
 

अमळनेर (प्रतिनिधी) येथील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉ.विनोद गोपाळ भट (वय ५६ ) यांनी आपल्या राहत्या घरात आज दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. डॉ. भट यांच्या आत्महत्येमुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. डॉ.भट यांचा शहरातील वाडी चौका जवळील कुंभार टेकडी परिसरात दातांचा दवाखाना आहे.

 

डॉ.विनोद भट हे शहरातील कुंभार टेकजवळ मागील २५ वर्षांपासून दातांचा दवाखाना चालवीत होते. आज दुपारी २ वाजेच्या सुमारास कुंभार टेकवरील स्वमालकीच्या घरामध्ये डॉ. विनय भट यांनी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच डॉ.भट यांच्या घरासमोर मोठी गर्दी झाली होती. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसून, पोलिस तपास सुरु आहे. त्यांच्या पश्चात मुलगा अभिषेक उर्फ(कृष्णा) व मुलगी,पत्नी असा परिवार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound