पुणे प्रतिनिधी । पीक विमा नाकारणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात आज बुधवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास शिवसेनेतर्फे मोर्चा काढण्यात आला असून त्याची सुरुवात येरवडा पोस्ट ऑफिसपासून ते कॉमरझोन आयटी पार्कमध्ये हा मोर्चा नेण्यात आला.
सध्या शेतकरी दुष्काळात असून, विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना पीक विमा नाकारण्यात येत आहे. म्हणून या पीक विमा नाकरणाऱ्या कंपन्यांच्या विरोधात शिवसेने तर्फे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाच पाहिजे. शिवसेनेचा विजय असो अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या. कॉमरझोन आयटी पार्कमध्ये जाण्यावरुन पोलीस व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची देखील झाली. यावेळी शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, माजी खासदार आढळराव पाटील तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थितीत होते.