चाळीसगाव, प्रतिनिधी | चाळीसगाव विधानसभेतील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण त्यांचा प्रचार दौरा सुरू असून या प्रचारासाठी गावकरी एकवटले आहेत. प्रत्येक गावातून अनोख्या रॅलीचे आयोजन करण्यात येत आहेत. मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते या प्रचारात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मंगेश चव्हाण यांच्या प्रचार रॅलीमध्ये शिवसेनेचे पप्पू गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुंजाळ यांनी सांगितले की, महाराष्ट्र एका वेगळ्या उंचीवर नेण्यासाठी हे सर्व पक्ष एकत्र आले आहे. आपल्याला एक होऊन काम करायचे आहे. प्रत्येकाने स्वतः मंगेश चव्हाण समजून स्वतःला झोकून देत काम केले पाहिजे. पक्ष निश्चितच आपल्या प्रामाणिकपणाची दखल घेईल. त्यामुळे सर्वांनी या महाराष्ट्राच्या विकासासाठी एकत्र येऊन काम करा असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.या प्रचार रॅलीचा आडगाव येथून शुभारंभ होऊन पुढे उंबरखेड, पिंपळवाड म्हाळसा, टाकळी प्र. दे., शिरसगाव, तलोंदे प्र.दे., काकळणे, नांद्रे, अलवाडी देशमुख वाडी, मांदुरने, उपखेड, सेवानगर, तामसवाडी, पिलखोड, सायगाव, देवळी, चिंचखेडे, परशुराम नगर व दडपिम्प्री येथे या प्रचार रॅलीची सांगता करण्यात आली. मंगेश चव्हाण यांनी रॅलीदरम्यान जनतेसोबत संवाद साधत तुम्हीच माझ्यासाठी दैवत आहात. तुमचा व मित्रपरिवाराचा पाठिंबा कायमस्वरूपी माझ्या पाठीशी असू द्या. तुम्ही दाखवलेल्या विश्वासाला कदापिही तडा जाऊ देणार नाही. तुमच्या प्रत्येक सुख दुःखात सहभागी होत तालुक्याच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील. शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या योजना तळागळात पारदर्शकपणे पोहोचविण्याचे काम करेल. खा. उन्मेष पाटील यांच्या रूपाने तालुक्याच्या विकासाचे विविध कामांच्या माध्यमातून पायाभरणी झाली असून ते काम तुम्हा सर्वांच्या साथीने मला पूर्णत्वास न्यायचे आहे. त्यासाठी आपण भारतीय जनता पक्षाला व मला मतदान रुपी आशीर्वाद देऊन सेवेची संधी द्यावी असे नम्रतेचे आवाहन त्यांनी केले. खासदार उन्मेष पाटील व जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती सभापती पोपट तात्या भोळे, भाजपा तालुकाध्यक्ष के. बी. साळुंखे, पं. स. सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजू पाटील, विधानसभा प्रचार दौरा प्रमुख दिनेश बोरसे, केंद्रीय कृषी अनुसंधान परिषद सद्स्य कैलास सूर्यवंशी, मार्केट सभापती रविंद्र पाटील, मार्केट उपसभापती महेंद्र पाटील, माजी तालुकाध्यक्ष सुरेश सोनवणे यांची उपस्थिती होती. तसेच मार्केट संचालक धर्मा काळे,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रोहन सूर्यवंशी, रविंद्र केदारसिंग पाटील, सरपंच आडगाव रावसाहेब पाटील, उपसरपंच देवळी अतुल पाटील, आबासाहेब रणदिवे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस मनोज बापू साबळे, मार्केट संचालक किशोर पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी शिरीष जगताप, माजी पं. स. सदस्य पतींगबापू पाटील, प्रताप पाटील, विलास उर्फ पिंटू पाटील, शरद पाटील, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल चव्हाण, रुपेश पाटील, सचिन पाटील, दत्ता नागरे, राम पाटील, रामचंद्र पाटील, राजेंद्र पाटील यांच्यासह गट प्रमुख, गण प्रमुख, शक्तिकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन, संचालक, तालुक्यातील तालुका व जिल्हा युवामोर्चा, महीला आघाडी, सर्व पदाधिकारी तसेच मित्रपक्ष शिवसेना, रिपाइं (आठवले गट), रासप,शिवसंग्रामचे सर्व भारतीय जनता पक्षाचे सर्व सन्माननीय जेष्ठ नेते, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.