थेरोळा शिवारात गावठी दारू हातभट्टी उध्वस्त; एकावर गुन्हा दाखल

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील थेरोळा शिवारातील पुर्णा नदीच्या काठी बेकायदेशीर गावठी दारूची हातभट्टी पोलीसांनी उध्दवस्त करून १ लाख ३० हजार ७०० रूपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुक्ताईनगर तालुक्यातील थेरोळा शिवारात बेकादेशीर गावठी दारू हातभट्टीची सुरू असल्याची गोपनिय माहिती मुक्ताईनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि राहुल बोरकर, सहाय्यक फौजदार सादीक पटवे, पोहेकॉ गणेश मनुरे, विजय पढार, रविंद्र धनगर, सागर सावे, राहूल नावकर यांनी मंगळवारी १५ मार्च रोजी कारवाई करून दारू बनविण्याचे कच्चे व पक्के रसायन नष्ट केले. यावेळी पोलीसांनी १६४ प्लास्टिक कॅनमध्ये २ हजार ४५० लीटर कच्चे रसायन, पक्के रसायन, २ ड्रम १०० लिटर उकळते रसायन, असा एकुण १ लाख ३० हजार ७०० रूपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.  याप्रकरणी पो.कॉ. रविंद्र धनगर यांच्या फिर्यादीवरून महादेव जग्गु बेलदार (वय-५०) रा. थेरोळा ता. मुक्ताईनगर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आाला आहे.

Protected Content