कंजरवाडासह सिंगापूर भागात गावठी हातभट्टीचे अड्डे उध्दवस्त

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील सिंगापूर, कंजरवाडा यासह जाकनी नगरात अवैध हातभट्टीची गावठी दारु तयार करणारे अड्ड्यांवर एमआयडीसी पोलिसांनी शुक्रवारी ४ मार्च रोजी पहाटे ५ वाजता धाड टाकून दारू नष्ट केली तर १ लाख ७१ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलीसात ९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगापूर, कंजरवाडा, जाकनी नगर या भागात अवैध हातभट्टीची गावठी दारु तयार करणार्‍यांवर सहाय्यक पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकाने शुक्रवारी ४ मार्च रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत हातभट्टीची गावठी दारु तयार करणारे अड्डे उद्धवस्त करण्यात आले. तसेच १ लाख ७१ हजार ६२० रुपये किमतीचे गावठी हातभट्टीची दारु व ते तयार करण्यासाठी लागणारे कच्चे व पक्के रसायन व दारु बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

 

एमआयडीसी पोलिसांनी केलेल्या कारवाईत वर्षा गोकुळ बागडे (वय २२), राजेश गुंड्या माछलेकर (वय ४४), अनिता सुधाकर बागडे (वय ५२), अनिता दिलीप माचोरेकर (वय ४३), संजय भटू नेतलेकर (वय ५०), सचिन अशोक रावलकर (वय ३५) सर्व रा.  जाखनीनगर कंजरवाडा, मंगलकुमार दिववान गुमाने (वय ५०, रा. नवल कॉलनी संजय गांधी नगर), बादल देवसिंग बाटुंगे (वय ४०, रा. नवल कॉलनी), सोनू पवन मलके (वय २२, रा. नवल कॉलनी) या ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

Protected Content