अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील फापोरे बुः ता. येथे श्री गुरुदेव दत्त महाराजांची यात्रा दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील शनिवारी ता.6 एप्रिल रोजी होणार आहे. या यात्रेनिमित्त फापोरे येथील ग्रामस्थांनी ग्रामीण भागातील भजनी मंडळाच्या कला गुणांना वाव मिळावा, यासाठी भजनी मंडळाची स्पर्धा आयोजित केली आहे.
यावेळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी फी 101 रूपये आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या भजनी मंडळास बक्षिस रूपये 5001 ,दुसऱ्या क्रमांकाचे बक्षिस रूपये 3001 व तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या भजनी मंडळास रूपये 2001 बक्षीस देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी 7 मिनिटे वेळ देण्यात येईल. याप्रसंगी स्पर्धेचे परिक्षक संगीत विशारद वसुंधरा लांडगे व शरद सोनवणे हे असून स्पर्धेची वेळ संध्याकाळी 7.30 वाजेस राहणार आहे. परिसरातील जास्तीत जास्त भजनी मंडळानी स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन फापोरे ग्रामस्थानी केले आहे.