यावल प्रतिनिधी । येथील पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. निलेश पाटील यांची नुकतीच यावलहुन कळवण जिल्हा नाशिक येथे बदली झाल्याने रिक्त झालेल्या पदावर भुसावळचे गटविकास अधिकारी विलास भाटकर यांच्याकडे पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणुन पदभार स्वीकारला आहे.
यावेळी यावल पंचायत समितीचे उपसभापती योगेश दिलीप भंगाळे , भाजपाचे उज्जैनसिंग राजपुत , पंचायत समितीच्या सदस्या कलीमा सायबु तडवी, ग्राम पंचायत विस्तार अधिकारी किशोर सपकाळे , कनिष्ठ अभियंता प्रविण भारंबे यांच्यासह कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी तसेच तालुका ग्रामसेवक संघटनेचे तालुका अध्यक्ष रुबाब तडवी , सचिव पुरूषोत्तम तळेले , आर टी बाविस्कर , ग्रामसेव हितेन्द्र महाजन त्यांचे स्वागत केले आहे . प्रभारी गटविकास अधिकारी विलास भाटकर हे मागील तिन वर्षापासुन भुसावळ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणुन कार्यरत आहे. दरम्यान विलास भाटकर हे मुळ वढोदा तालुका मुक्ताईनगर येथील रहिवासी असुन , त्यांनी सन१९९३ साली म्हणजे सुमारे २८ वर्षापुर्वी यावल पंचायत समितीमध्ये ते कृषी विस्तार अधिकारी म्हणुन कार्यरत होते. आज वितास भाटकर यांनी यावल पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी पदाची सुत्रे स्विकारताच सर्व विभागाच्या अधिकारी यांची तात्काळ बैठक घेवुन कामाचा आढावा घेतला.