नवी दिल्ली (वृत्तसंस्था) इस्रो चांद्रयान -2चे लँडर ‘विक्रम’ शनिवारी पहाटे चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवणार आहे. हा भारातासाठी ऐतिहासिक दिवस असणार आहे. कारण भारताची ही दुसरी चंद्र मिशन चंद्राच्या त्या दक्षिण ध्रुव क्षेत्रावर प्रकाश टाकेल जिथे आजपर्यंत कोणत्याही देशाने पाय ठेवला नाही.
चांद्रयानाचे विक्रम लँडर सध्या चंद्राभोवतीची कक्षा कमी करत चंद्राच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे. हा प्रयत्न यशस्वी होत असल्याने नियोजित दिवशी, शनिवारी विक्रम चंद्रावर उतरेल, याबद्दल इस्रोच्या शास्त्रज्ञांना विश्वास आहे. विक्रम लँडरसोबत प्रज्ञान हे रोव्हर देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुमारे ७० विद्यार्थ्यांसह इस्रोच्या बंगळुरू केंद्रात हे पाहणार आहे. यासह अमेरिकन एजन्सी नासासह संपूर्ण जगाचे लक्ष या मोहिमेवर आहे. लॅन्डर विक्रममध्ये तीन ते चार कॅमेरे आणि सेन्सर्ससह अशी सर्व तंत्रज्ञान वापरली गेली आहे, ज्यामुळे त्याचे कोणतेही नुकसान होणार नाही.