जामनेर (प्रतिनिधी) येथील युवा कवी आणि साहित्यिक तसेच ‘खान्देश कवी’ या टोपण नावाने कविता लिखान करणारे कवी विजय सुर्यवंशी यांच्या काही कविता दि. १९ जुलै २०१९ रोजी शुक्रवारी संध्याकाळी जळगाव आकाशवाणी केंद्राच्या युवा वाहिनीवरून प्रसारित होणार आहेत.
विजय सुर्यवंशी यांच्या काही कविता दि. १९ जुलै २०१९ रोजी शुक्रवारी संध्याकाळी ५.३० वाजता सादर होणार आहेत. त्यात प्रामुख्याने ‘ दुष्काळ, वादळ, शिवबा, भृण हत्या, लहर,श्रावण मांस, भ्रष्टाचारी, पंढरीची वारी, स्वागत स्री जन्माचे’ या कवितांचा समावेश आहे. कवी विजय सुर्यवंशी हे काॅलेज जीवनापासूनच कविता लिखाण करत आहे. आतापर्यंत त्यांनी मोठमोठ्या साहित्य संमेलनात, विविध कवी संमेलनात कविता सादर केल्या आहेत.