Home Cities जळगाव जळगाव भाजप हॉकर आघाडी जिल्हाध्यक्षपदी विजय पिंगळे यांची नियुक्ती

जळगाव भाजप हॉकर आघाडी जिल्हाध्यक्षपदी विजय पिंगळे यांची नियुक्ती


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारतीय जनता पार्टी जळगाव महानगरतर्फे हॉकर आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी विजय पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली असून, या नियुक्तीमुळे पक्ष संघटनाला नवी बळकटी मिळणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांनी जारी केलेल्या नियुक्तीपत्रानुसार, विजय पिंगळे यांची जळगाव महानगर हॉकर आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. या नियुक्तीसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण तसेच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे मंत्री गिरीश महाजन, संजय सावकारे यांच्यासह पक्षातील अन्य वरिष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन लाभल्याचे नमूद करण्यात आले आहे.

पिंगळे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते असून त्यांनी आतापर्यंत विविध संघटनात्मक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांच्या कामाची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. आगामी काळात त्यांनी अधिक जोमाने संघटनात्मक काम करत पक्ष बळकट करण्यासाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

भाजपाच्या ‘राष्ट्र प्रथम, एकात्म मानवतावाद, अंत्योदय’ या विचारसरणीवर विश्वास ठेवून पिंगळे यांनी पक्ष शिस्त, संघभावना आणि सहकार्याच्या तत्त्वांनुसार कार्य करावे, असेही नियुक्तीपत्रात नमूद आहे. तसेच केंद्र व राज्य सरकार आणि जनतेमध्ये समन्वय साधत पक्षाचा विस्तार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

या नियुक्तीनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून विजय पिंगळे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, शहरातील हॉकर आघाडीच्या संघटनात्मक कामकाजाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


Protected Content

Play sound