जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस् येथे विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या हस्ते आज रोजी वृक्षारोपण करुन मियावाकी पध्दतीचा लहान वन प्रकल्प उभारणीस सुरुवात करण्यात आली.
यावेळी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा. किशोर पवार,विभागप्रमुख डॉ.आर.एस.बेंद्रे, डॉ.विकास गीते यांच्या हस्ते देखील वृक्षारोपण करण्यात आले. स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस प्रशाळेच्या इमारती जवळील खुल्या जागेत २०X२० फुट या चौरस जागेत हा वन प्रकल्प उभा करण्यात येत आहे. प्रशाळेतील विद्यार्थ्यांकडून व शिक्षकाकडून विविध वृक्षांची १५० रोपे लावण्यात येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण होण्यास मदत होईल. हा वन प्रकल्प यशस्वी करण्यासाठी प्रशाळेचे संचालक प्रा.डी.एच.मोरे, शिक्षक, शिक्षकेत्त्र कर्मचारी, उद्यान विभागातील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.