जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जनसंवाद आणि पत्रकारिता विभागात ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि ‘एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता)’ या कौशल्यआधारित व रोजगारभिमुख पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया दि. 22 जुलै 2022 पासून सुरु होणार असून ऑनलाईन पध्दतीने थेट प्रवेश देण्यात येणार आहे.
‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ हा बारावी नंतरचा एक वर्षीय अभ्यासक्रम विभागात यावर्षी पासून प्रथमच सुरु करण्यात आला आहे. एम.ए. एम.सी.जे. (जनसंवाद आणि पत्रकारिता) हा दोन वर्षीय पदव्युत्तर अभ्यासक्रम असून चार सत्रात शिकविला जातो. युजीसीच्या नवीन नियमावलीनुसार दोन्ही अभ्यासक्रम आहेत. यात विद्यार्थ्यांचे पत्रकारिता आणि जनसंवाद क्षेत्रातील कौशल्य विकसित करण्यावर भर देण्यात आलेला आहे.
सीबीसीएस (Choice Based Credit System) नुसार या अभ्यासक्रमात ऑडिट कोर्सच्या माध्यमातून विद्याथ्र्यांना इतरही अधिकचे कौशल्य शिकता येणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना रोजगाराचे नवे दालन उपलब्ध होणार आहे. कौशल्यआधारित विषयात विद्यार्थ्यांना भारतीय संविधान, सॉफ्ट स्किल, भारतीय संगीत कला, योगशास्त्र, क्रीडा प्रकार, इंग्लिश स्पिकिंग, रेडिओ जॉकी, व्हिडीओ संपादन, कॅमेरा हँडलिंग, सायबर सिक्युरिटी आदी विषयापैकी प्रत्येक सत्रात एक याप्रमाणे चार विषय निवडायचे आहे. त्यामुळे रोजगाराचे इतरही क्षेत्र विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होणार आहे.
दोन्ही अभ्यासक्रम पूर्णत: रोजगारभिमुख असून यशस्वी विद्यार्थ्यांना वृत्तपत्रे, रेडिओ, टेलिव्हिजन, ऑनलाईन पत्रकारिता, सोशल मिडिया, जाहिरात संस्था आदी ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहे. त्याचबरोबर शासकीय किंवा खाजगी क्षेत्रात जनसंपर्क अधिकारी, संवाद तज्ज्ञ, सोशल मिडिया हँडलर म्हणून कार्य करण्याची देखील संधी उपलब्ध आहे.
‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ ला प्रवेश घेण्यासाठी इयत्ता बारावीत किमान 40 टक्क्यांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर एम.ए.एम.सी.जे. या अभ्यासक्रमाला देखील प्रवेश घेण्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी किमान 40 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेशाकरीता विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या www.nmu.ac.in या संकेतस्थळावर भेट देवून ऑनलाईन अॅडमिशन लिंक ला क्लिक करून प्रवेशासंबंधी अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन पध्दतीने प्रवेश अर्ज भरतांना आवश्यक त्या कागदपत्रांची स्कॅन कॉपी सोबत जोडणे गरजेचे आहे.
तरी ईच्छुक विद्यार्थ्यांनी ‘डिप्लोमा इन जर्नालिझम’ आणि ‘एम.ए. एम.सी.जे.’ प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुधीर भटकर (8407922404) डॉ.विनोद निताळे (9860046706) अथवा विभागात कार्यालयीन वेळेत 0257-2257436, 2257438 या क्रमांकावर संपर्क साधावा किंवा विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील माहितीपत्रक वाचावे असे आवाहन कला व मानव्यविद्या प्रशाळेचे संचालक प्रा.डॉ.अनिल चिकाटे यांनी केले आहे.