विद्यापीठातर्फे ‘स्वामी विवेकानंद आणि आजचा तरुण’वर पथनाट्य

NMU 1

जळगाव प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्वामी विवेकानंद अध्ययन व संशोधन केंद्रातर्फे स्वामी विवेकांनद आणि आजचा तरुण याविषयावर जळगाव येथील स्वराज्य पथनाटय ग्रुपच्या कलावंतांनी विद्यापीठ परिसरात विविध ठिकाणी पथनाटय सादर केलीत.

स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या तरुणांना पर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील लॉनवर स्वराज्य ग्रुप च्यावतीने पथनाटय सादर करण्यात आले. यावेळी व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप रामू पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, दीपक बंडू पाटील व विद्यापीठ कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.मनीष जोशी यांनी केले.

स्वामी विवेकांनदाच्या विचारांचा तरुणांसाठी जागर करण्यासाठी विद्यापीठ रसायन तंत्राज्ञान संस्थेच्या लॉनवर पथनाटय सादरीकरण झाले. यावेळी संचालक प्रा.जे.बी.पाटील, प्रा.अनिल डोंगरे व प्रशाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. स्कूल ऑफ फिजीकल सायन्सेसच्या परीसरात पथनाटय सादरीकरण झाले. त्यावेळी संचालक प्रा.डी.एस.पाटील व अधिसभा सदस्य अमोल मराठे व विद्यार्थी उपस्थित होते. संगणकशास्त्र प्रशाळेसमोर पथनाटय सादरीकरण झाले. त्यावेळी प्रा.मनोज पाटील, कर्मचारी, व विद्यार्थी उपस्थित होते. स्वराज्य पथनाटय ग्रुपच्या विनोद पाटील, करण माळकर, नेहा पवार, राहुल पवार, हर्षा शर्मा, सागर जाधव व चंद्रकांत इंगळे यांनी पथनाटय सादरीकरणात सहभाग घेतला.

Protected Content