पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | राजयोग शोध आणि प्रतिष्ठानच्या शिक्षण प्रभागातर्फे दि. १२ ते १६ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ब्रह्माकुमारीज् मुख्यालय, माऊंट आबू (राजस्थान) येथे विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षणतज्ज्ञांसाठी राष्ट्रीय शिक्षा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
“शिक्षा में आध्यात्म – करुणा और दया” या मुख्य विषयावर देशभरातील विद्यापीठांचे कुलगुरु, कुलसचिव, महाविद्यालयांचे प्राचार्य, विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी होतील. संमेलनात केवळ विद्यापीठ आणि महाविद्यालयातील शिक्षक सहभागी होऊ शकतात. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी हे संमेलन नाही.
संमेलनात सहभागासाठी जवळच्या स्थानिक ब्रह्माकुमारीज् सेवाकेंद्राशी संपर्क करावा. यासंबधी अधिक माहिती हवी असल्यास डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र माध्यम समन्वयक, ब्रह्माकुमारीज् यांच्याशी ९८५०६९३७०५ यावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निसर्ग सौंदर्याने बहरलेले जागतिक किर्तीचे पर्यंटन केंद्र माऊंट आबू
श्रावणातील माऊंट अबू पहाण्याकरीता जगभरातील पर्यटक येतात. अप्रतिम निसर्ग सौंदर्याने बहरलेले माऊंट आबू कडे जगातील नैसर्गीक आणि आध्यात्मिक उर्जेचे शक्तिपीठ म्हणून पाहिले जाते. सुंदर तलाव, धबधबे, बगीचे, डोंगरदऱ्या, नेत्रदिपक सुर्यास्त आदि नैसर्गीक पर्यटन स्थळाबरोबर स्थापत्यशास्त्राचा अद्वितीय देलवाडा, अचलगढ, गुरुशिखर, आबू अंबाजी, पीसपार्क, ज्ञानसरोवर, पांडवभवन, शांतीवन, ग्लोबल हॉस्पिटल आदि विविध विशाल आध्यात्मिक शक्तिस्थाने सुद्धा आहेत. संमेलनास नोंदणी आवश्यक असून ती ऑनलाईन आहे. नोंदणीची अंतिम दि. ३० जुलै २०२२ ही आहे.