विधी शाखेच्या विद्यार्थांचे कुलगुरूंना पुन्हा निवेदन ; आंदोलनाचा इशारा

nmu new name

जळगाव प्रतिनिधी । विधी शाखा अभ्यासक्रमात ३५ गुणांची पासिंग व ४० गुणांच्या ॲग्रीगेटसाठी निवेदन देण्यात आले होते. परंतू अद्यापही मागणी पूर्ण न झाल्यामुळे दि.30 जुलै रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे कुलगुरु यांना पुन्हा निवेदन देण्यात आले. तसेच दोन दिवसात मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा विधीच्या विद्यार्थांकडून देण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, 17 जुलै रोजी एस.एस.मणीयार लॉ कॉलेज व डी.यु.पा.लॉ कॉलेज, जळगाव तसेच 19 जुलै रोजी डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज, धुळे व एन.टी.व्ही.एस.लॉ कॉलेज, नंदुरबार येथील विद्यार्थ्यांनी निवेदन सादर केले होते. एप्रील, मे २०१९ च्या विधी विधी विषयाच्या परिक्षेतील पेपर तपासणीत विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला असून त्यासाठी फेरतपासणी करुन व पासिंग निकष ३५ मार्कसला पासींग व ४० चा अॅग्रीगेट असा ठेवावा अशी विनंती करण्यात आली होती. तर यावर फक्त विद्यार्थ्यांना आश्वासन देण्यात आली आहे. निवेदन देऊन 12 दिवस झाले असून यावर निर्णय कधी घेण्यात येईल, असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून उपस्थितीत होत असून पुन्हा निवेदन देण्यात येत आहे. विधी अभ्यास मंडळाने ३५ गुणांची व ४० गुणांची ॲग्रीगेट संबंधी ठराव पास केला असून तोच ठराव अभ्यास मंडळाने दि. २६ जुलै रोजी अभ्यास मंडळाच्या मिटींगमध्ये देखील मंजुर झाल्याच अंतर्गत सुत्रांकडुन कळाले आहे. ठराव अभ्यास मंडळाने मंजुर करुन सुध्दा अद्यापही लागु केलेला नाही. यामुळे विद्यार्थी हे दुविधा मनस्थितीत असुन त्यांचा विद्यापीठ प्रशासनाबद्दल असंतोष वाढत चालला आहे.

शैक्षणिक वर्ष 2017-18 ला सीजीपीए लागु करण्यात आला तर 2018-19 ला का लागु करण्यात आलेला नाही. त्यामुळे विधी विषयाच्या सर्वच मुलांचे अतोनात नुकसान झालेले आहे. म्हणून लवकरच विद्यापीठ प्रशासनाने ३५ची पासींग व 40 ची ॲग्रीगेटचा ठराव विधी शाखेने सर्व वर्गांना 2 दिवसात लागु करावा अन्यथा 2 ऑगस्ट रोजी विधी शाखेचे सर्व विद्यार्थी विद्यापीठात आंदोलन करतील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Protected Content