हॉटेलमधील हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल !

भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील एका हॉटेल येथे बिलाचे पैसे मागितल्याच्या कारणावरून दोन जणांनी हॉटेल व्यवसायिकाला शिवीगाळ करत फायटरसह कुंड्या व दगड फेकून नुकसान केल्याची घअना शनिवारी २९ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक असे की, भडगाव शहरातील हॉटेल पुनम गार्डन येथील हॉटेल मालक पवन दत्तात्रय जडे वय २५ यांनी हॉटेलचे बिल मागितल्याचा राग आल्याने संशयित आरोपी बंटी मालचे, सचिन मालचे यांच्यासोबत असलेले दोन जणांनी शिवीगाळ करत हातातील फायटरने पवन जडे यांचा भावाच्या डोळ्याजवळ मारहाण केली. तर इतरांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर हॉटेल मधील झाडांच्या कुंड्या व दगडे मारून मोठे नुकसान केले आहे. तसेच हॉटेल मालक पवन जडे यांच्या हातीतील ५ ग्रॅमची अंगठी काढून घेतली आहे. याप्रकरणी पवन जडे यांनी भडगाव पोलीसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून भडगाव पोलीस ठाण्यात संशयित आरोपी बंटी मालचे आणि सचिन मालचे दोन्ही रा. यशवंत नगर, भडगाव आणि इतर दोन जणांविरोधात भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मस्के हे करीत आहे.

Protected Content