Home क्राईम विदगाव जवळ बनावट मद्यसाठा जप्त

विदगाव जवळ बनावट मद्यसाठा जप्त

0
100

crime

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील विदगाव येथे दि. 21 जुलै रोजी रात्री 10 वाजता मद्याची वाहतुक करणारी मारुती ओमनी कार जप्त करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, विदगावजवळ बेकायदा मद्याची वाहतूक करणारे एक वाहन येणार आहे. त्यानुसार पोलिस विदगाव येथे पोहचले. यावेळी एक मारुती ओमनी कार आली. तिची तपासणी केली असता त्यात बनावट देशी दारुचे 30 बॉक्स आढळून आले. बनावट मद्य व मारुती ओमनी कार असे एकुण 1 लाख 64 हजार 880 रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound