शेगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नुकत्याच राज्याचा दहावी शालांत परिक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात शेगांव येथील पत्रकार अनिल उंबरकर यांच्या कन्येने दहावीच्या परीक्षेत 84% घेऊन घवघवीत यश प्राप्त केले याबद्दल दिनांक २८ मे रोजी संध्याकाळी सात वाजता ज्येष्ठ पत्रकार अनिल उंबरकर यांच्या निवासस्थानी जाऊन शेगाव तालुका व्हॉइस ऑफ मिडिया या पत्रकारांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कु. धनश्री अनिल उंबरकर हिचा शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार केला. तिच्यासोबतच आई-वडिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे शेगाव तालुकाध्यक्ष अध्यक्ष नानासाहेब पाटील, उपाध्यक्ष महेंद्र मिश्रा, सचिव समीर देशमुख, प्रमोद काळे, विठ्ठल अवताडे, लालीत देवपूजारी, ज्ञानेश्वर टाकोते, रोहित देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.
व्हॉइस ऑफ मीडिया संघटना पत्रकारांच्या प्रश्न बाबत तसेच पत्रकारांच्या उन्नतीकरिता सकारात्मक विचारवर नेहमीच आघाडीवर राहिली आहे. पत्रकारांच्या हक्कांसाठी आणि पत्रकारांच्या हितासाठी संघटनेचे काम चालत असते. पत्रकारितेचे वाढते आवाहन त्याचबरोबर पत्रकारितेचे नवे स्वरूप आणि सकारात्मक पत्रकरिता या बाबींना समोर ठेवत व्हाईस ऑफ मीडिया ही संघटना अग्रणी राहिली आहे. पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबांसाठी कल्याणकारी नवनवीन योजना संघटनेमार्फत राबवले जातात.