ज्येष्ठ विचावंत व गांधीवादी नेते मारोतराव गडकरी यांचे निधन

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | ज्येष्ठ सर्वोदयी विचारवंत आणि प्रखर गांधीवादी नेते मारोतराव मल्हारराव गडकरीयांचे निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. त्यांना मा म गडकरी म्हणूनही ओळखले जात असे. महात्मा गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन कार्यारंभ केलेल्या मा.म. गडकरी यांनी आयुष्यभर त्या विचारांचे पालन केले आणि जीवनाला अर्थ प्राप्त होण्यासाठी सतत चालत राहा, हाच जीवनाचा आशय असल्याची शिकवण त्यांनी अंमलातही आणली. स्वातंत्र्य चळवळी मध्यावर असतानाच्या काळात म्हणजेच 26 एप्रिल 1933 रोजी शेतकरी कुटुंबात जन्मलेले मारोतराव गडकरी हे विनम्रता आणि ज्ञानयात्री होते.

महात्मा गांधी यांनी दिलेला सेवेसाठी जीवन हा विचार त्यांनी आयुष्यभर उराशी बाळकला. ते पेशाने वकिल होते. पण रमले महाविद्यालयीन अध्यापनात. त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक काळ हा गांधीविचार देणाऱ्या संस्थांमध्येच व्यतीत झाला. अगदी बालपणी म्हणजेच वयाच्या केवळ 12 व्या वर्षापासून ते स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक कार्यात रमले. अल्पावधीतच त्यांनी स्वात:ला गावातील तुकडोजी महाराजांचे गुरुदेव सेवा मंडळ आणि सुरगाव आश्रमात विनोबाजींसोबत ग्रामसफाई अभियान आदींसोबत जोडून घेतले. पुढे साधारण 1947 मध्ये त्यांना महात्मा गांधी यांच्या सभेस जाण्याची संधी मिळाली. महात्मा गांधी यांनी वर्धा जिल्ह्यात दिलेल्या सभेतील भाषणाने ते इतके भारावून गेले की, त्यांनी विद्यार्थीदशेत असतानाच ग्रामिण भागात शिक्षणाचे कार्य सुरु केले आणि इतरही सामाजिक कार्यास वाहून घेतले.

दरम्यान, महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच त्यांचा संपर्क महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे आणि साने गुरुजी यांच्याशी आला. ज्यामुळे या महानुभावांच्या विचारांवर श्रद्धा ठेऊन काम करण्याचा त्यांनी निश्चय केला. ते केवळ निश्चय करुन थांबले नाहीत. तर त्यांनी तसे कार्यही सुरु केले. हा विचार घेऊनच ते नागपूर येथे आले आणि त्यांनी तिथेच 1960 पासून कार्यारंभ केला.

आयुष्यभर सकारात्मक वृत्तीने राहणारे मा. म. गडकरी हे सदैव कार्यरत राहिले. त्यामुळे त्यांनी ज्या कोणत्या क्षेत्रात, संस्थेत काम केले, त्या सर्व ठिकाणी ते नवनिर्मिच्या दृष्टीनेच कार्यरत राहिले. आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान जळवळीत त्यांनी विशेष महत्त्वाची भूमिका निभावली. सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठाणचे अध्यक्ष म्हणून त्यांची 10 मार्च 2008 मध्ये निवड झाली. हे सेवाग्राम जगातील अहिसेचे विद्यापीठ व्हावे, येथून जगाला अहिंसेचा मार्ग दिसावा यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले.

Protected Content