मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आयुष्यभर वारकरी संप्रदायाची पताका हात घेतलेले ज्येष्ठ किर्तनकार तथा निरूपणकार बाबा महाराज सातारकर यांचे आज देहावसान झाले आहे.
बाबा महाराज सातारकर ( वय ८९) यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ५ फेब्रुवारी १९३६ रोजी सातारा येथे जन्मलेल्या बाबा महाराजांच्या घराण्याला वारकरी वारसा होता. बाल वयातच त्यांची किर्तने गाजू लागली होती. त्यांचे आजोबा दादा महाराज हे ख्यातनाम किर्तनकार होते. त्यांचा वारसा बाबा महाराजांची अतिशय समर्थपणे चालविला. देश-विदेशात त्यांनी हजारो किर्तनांच्या माध्यमातून भागवतधर्माची सेवा केला.
बाबा महाराज सातारकर यांचे अल्पशा आजाराने नेरूळ येथील राहत्या घरी निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने समाजाच्या सर्व स्तरांमधून शोक व्यक्त करण्यात येत आहे.