ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना स्वाईन फ्लू


मुंबई (प्रतिनिधी) ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींना स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. सर्दी-खोकला झाल्यामुळे त्या तपासणीसाठी गेल्या होत्या, त्यावेळी चाचणी केल्यानंतर शबाना यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निदान झाले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हॉस्पिटलाईज झाल्यामुळे मला विसाव्यासाठी वेळ मिळत आहे, अशी प्रतिक्रिया शबाना आझमी यांनी दिली आहे. ‘मला शांत बसून आत्मचिंतनासाठी फार कमी वेळ मिळतो. मात्र आता जबरदस्ती विश्रांती घ्यावी लागत आहे. मी रुग्णालयात असून वेगाने रिकव्हरी होत आहे’ असेही शबाना आझमींनी सांगितले आहे.शबाना आझमी नुकत्याच जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलला गेल्या होत्या.

शबाना आझमी या प्रसिद्ध गीतकार कैफी आझमी यांच्या कन्या, तर गीतकार जावेद अख्तर यांच्या पत्नी आहेत. 1974 साली श्याम बेनेगल यांच्या ‘अंकुर’ चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. याशिवाय अमर अकबर अँथनी, किस्सा कुर्सी का, परवरिश, स्वामी, स्पर्श, थोडीसी बेवफाई अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here