मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं आज दीर्घ आजाराने निधन झाले आहे. विजय कदम यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. विजय कदम हे गेले दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी २ वाजता अंधेरी येथील स्मशानभूमी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.
विजय कदम यांनी चष्मेबहाद्दर, पोलीसलाईन, हळद रुसली कुंकू फसल, आम्ही दोघे राजा राणी अशा चित्रपटांमध्ये त्यांना भूमिका केली. विजय कदम यांच्या निधनामुळे अवघ्या मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. विजय कदम यांनी अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. याशिवाय काही मालिकांमधून ते प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. टूरटूर, सही दे सही, विच्छा माझी पुरी करा, पप्पा सांगा कुणाचे अशा अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या आहेत. यांनी साकारलेल्या विनोदी भूमिका विशेष गाजल्या.