पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी समाज बांधवांच्या वतीने मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड केल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात रस्त्यावरील दोन्ही बाजूने असलेल्या वाहतूकची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाल्याचे दिसून आले. दरम्यान आरक्षणासाठी घुसखोरी थांबविण्यासाठी गोर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन केले आहे.
गोरसेनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे. विमुक्त जातीच्या खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या आणि देणाऱ्यांवर कारवाईसह विविध मागण्यासाठी विमुक्त जाती प्रवर्गातील समाज बांधव एकत्र येवून रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणावर समाजबांधव रस्त्यावर उतरल्याचे पहायला मिळाले. यावेळी रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने रस्त्यावरील दोन्ही बाजंची वाहतूकीचा कोंडी झाली आहे. आक्रमक झाले आहेत. या आंदोलकांनी रस्त्यावर येऊन घोषणाबाजी द्यायला सुरुवात केली. त्यानंतर रस्त्यावरच ठिय्या मांडला.
राज्य सरकारचा तीव्र निषेधही नोंदवण्यात येत आहे. आता मराठा आरक्षणानंतर विमुक्त जाती अ प्रवर्गातील समाज सुध्दा रस्त्यावर उतरल्याने सरकारची डोकेदुखी झाली आहे. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा तसेच मंत्र्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. मागण्या मान्य झाल्या नाहीतर सत्ताधाऱ्यांना आगामी निवडणुकीत मतदान करणार नाही. त्यांना त्यांची जागा दाखवून देवू, असा इशारा समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे.