चाळीसगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सायगाव जवळील मन्याड नदीच्या पुलावरून अवैधरित्या वाळूची वाहतूक करणारे वाहनावर पोलिसांनी कारवाई केली. याप्रकरणी मेहुणबारे पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहुणबारे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील सायगाव गावात मन्याड नदीच्या पुलावर ट्रॅक्टर चालक मयूर राजेंद्र पाटील रा.पिलखोड ता.चाळीसगाव हा विना क्रमांकाच्या पिकअप वाहनात विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करताना मेहुणबारे पोलीस ठाण्याचे पो.ना. अन्वर तडवी यांनी पकडले. वाळू वाहतुकीबाबत परवाना विचारला असता उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानुसार पोलिसांनी सदरील वाहन जप्त करून मेहुणबारे पोलिस ठाण्यात जमा केले आहे. याप्रकरणी पो.ना. अन्वर तडवी यांच्या फिर्यादीवरून वाहनचालक मयुर पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक दीपक नरवाडे करीत आहे.