घाणेकर चौकात भाजीपाला विक्रेत्याला लोंखडी दांड्याने मारहाण

जळगाव प्रतिनिधी । काहीही कारण नसतांना घाणेकर चौकात एकाला लोखंडी रॉडने मारहाण करून हात मोडल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

शेख जावेद शेख ईस्माईल वय ४४ रा. मन्यारवाडा, जळगाव असे जखमी झालेल्या भाजीपाला विक्रेत्याचे नाव आहे. सविस्तर माहिती अशी की, मन्यारवाडा परिसरातील कोळीपेठ येथे शेख जावेद शेख ईस्माईल हे वास्तव्यास आहेत. ते कांदे बटाटे विक्री करुन उदरनिर्वाह भागवितात. शेख जावेद हे मंगळवार, १६ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे घाणेकर चौकात चौबे शाळेसमोर कांदे बटाटे विक्री करत होते. यादरम्यान साायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दस्तगीर शेख शेरु मिस्तरी रा. ईस्लामपुरा जळगाव हा शेख जावेद यांच्या दुकानावर आला. त्याने शेख जावेद यांना कुठलेही कारण नसतांना पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता, दस्तगीर शेख याने शेख जावेद यांना चापटा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच याठिकाणी असलेल्या छत्रीच्या लोखंडी दांड्याने हातावर मारहाण केली. या मारहाणीत शेख जावेद यांच्या हाताचे हाड मोडले आहे. याप्रकरणी शेख जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरुन दस्तगीर शेख शेरु मिस्तरी याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content