जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा येथे ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या वीर गुर्जर क्रिकेट लीगच्या लोगोचे अनावरण बुधवारी ८ जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या उपस्थितीत मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाला दोडे गुर्जर संस्थानचे सचिव डॉ.राधेश्याम चौधरी, माजी जि.प.सदस्य प्रतापराव पाटील, त्रिमुर्ती फाऊंडेशनचे अध्यक्ष मनोज पाटील, दिशा ऑटो लिंकचे अजय पाटील, मा.मंत्रीमहोदय गुलाबराव पाटील यांचे स्विय सहाय्यक नवलसिंग राजे पाटील, गुर्जर कवी प्रफुल्लनाना पाटील, आयकर विभागाचे अधिकारी हिरालाल पाटील, पोस्ट ऑफीसचे अधिकारी तथा माजी सैनिक गोपाल पाटील, वीर गुर्जर क्रिकेट लीगचे मार्गदर्शक अविनाश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी सर्व मान्यवरांनी चोपडा येथे होणाऱ्या वीर गुर्जर क्रिकेट लीगला शुभेच्छा दिल्या.