वेदांता-फॉक्सकॉनची लवकरच महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातमध्ये गेल्यावरून आरोप प्रत्यारोप होत असतांना कंपनीने महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक करण्याची ग्वाही दिली आहे.

वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप सुरु असतानाच वेदांत कंपनीचे प्रमुख अनिल अग्रवाल यांनी चार ट्विटच्या माध्यमातून महत्वाची घोषणा केली आहे. यात त्यांनी नमूद केले आहे की, कोट्यवधी रुपयांची ही दिर्घकालीन गुंतवणूक असून यामुळे भारतीय इलेक्ट्रॉनिक श्रेत्राचा दशा आणि दिशा बदलणार आहे. आम्ही देशभरामध्ये परिसंस्था उभारणार आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्येही गुंतवणूक करण्यास कटीबद्ध आहोत. गुजरातपासून सुरु झालेल्या या प्रवासामध्ये देशभरात विस्तार करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा असणार आहे. अर्थात, महाराष्ट्रात लवकरच मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये १२ हजार कोटी रूपयांच्या सवलती जास्त मिळाल्याने तेथे प्रकल्प हलविण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच हा निर्णय काही महिने आधीच घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content