कासोदा, ता.एरंडोल (प्रतिनिधी) येथील माजी जि.प. उपाध्यक्ष हिम्मतराव भिला पाटील यांचे सासरे वसंतराव पंडितराव पाटील (रा.कावपिंप्री, जिल्हा धुळे) (वय ८२) यांचे आज (दि.२४) सकाळी ८.०० वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. ते अनिल वसंतराव पाटील यांचे वडील होते.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, जावई, सुना व नातवंडे असा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या (दि.२५) सकाळी १०.०० वाजता त्यांच्या कावपिंप्री येथील राहत्या घरून काढण्यात येणार आहे.