मानवाधिकार न्याय जनसेवा ट्रस्टच्या जिल्हा सल्लागारपदी वर्षा बाविस्कर

जळगाव प्रतिनिधी । मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्ट, नवी दिल्ली संस्थापक व राष्ट्रीय कार्यकारी दिनेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा बाविस्कर यांची जळगाव जिल्हा महिला सल्लागारपदी नुकतीच नियुक्त केली आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे यांनी नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. वर्षा प्रविणकुमार बाविस्कर या वडगाव बु .येथील जि.प.मराठी मुलांची शाळेत मुख्याध्यापिका आहेत. त्यांना समाजाचे कामासोबतच सामाजिक कार्याची आवड आहे. गेल्या दहा वर्षांपासून अखिल भारतीय कोळी समाजाचे निष्ठावान कार्यकर्त्यां आहेत. समाजात नेहमी सामाजिक विविध उपक्रम व कार्यक्रम आयोजित करून गरजवंताना सहकार्य करत असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना जळगाव जिल्हा महीला सल्लागार पदी नियुक्ती करण्यात आली.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश आई.टी.सेल सचिव डॉ. राजनराम जैसवार, राष्ट्रीय प्रभारी संजय गुप्ता, प्रदेश सचिव अनिल नंन्नवरे, जळगाव जिल्हा युवक अध्यक्ष धनराज साळूंके, जिल्हा उपाध्यक्ष योगेश बाविस्कर, सचिव ज्ञानेश्वर पाटील, जळगाव महानगर प्रमुख किरण भावसार, जिल्हा युवक उपाध्यक्ष उमेश उर्फ राहूल निकुंभ व मानवाधिकार न्याय जन सेवा ट्रस्टचे पदाधिकारी उपस्थित होते.

वर्षा बाविस्कर यांचे निवडीचे परेशभाई कोळी, राज्य युवा अध्यक्ष, अखिल भारतीय कोळी समाज, प्रवीणकुमार बाविस्कर सर, महीला पदाधिकारी डॉ.रूचिता धनगर, मंगला सोनवणे, अॅड.शोभाताई खैरनार, हिरालाल वाकडे आदींनी अभिनंदन केले.

 

Protected Content