मुक्ताईनगर प्रतिनिधी । ना. बच्चू कडू यांच्या वाढदिवसनिमित्त आज प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.
तसेच युवा पिढीसमोर एक नवीन आदर्श ठेवण्यात आला. ना.बच्चू यांच्या आवाहनुसार शहरात कुठेही बॅनर, पोस्टरबाजीवर खर्च करण्यात आला नाही. ना.बच्चु कडूंच्या आवाहनुसार त्याच अनावश्यक होणाऱ्या खर्चातून गोरगरीब जनतेसाठी मदत करण्यात आली मुक्ताईनगर शहराजवळ असणा-या आदिवासी तांड्यात गळणाऱ्या घरांवर टिन वाटप करण्यात आले. तसेच गरजू गोरगरीब महिलांना साडी वाटप करण्यात आले आहे. वृक्ष लागवड व संगोपन अभियानाअंतर्गत वृक्षांची लागवड करण्यात आलीत. आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषध वाटप करण्यात आले. तसेच गरजू लहान मुलांसाठी कपडे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी प्रहार जनशक्ती पक्षाचे डॉ. विवेक सोनवणे, माजी सरपंच विलास पांडे, हर्षल धनगर, अमोल वैद्य, हृषिकेश पाटील, संतोष राजपूत, राम सोनार, सुधाकर देशमुख, उत्तम जुमळे, चंद्रकांत वंजारी, गोपाळ दाणि, अजय पांडे, गजू सोनार, प्रमोद सौंदणे, शाकीर शेख, चंद्रमणी शिरतुरे यांच्यासह आदि उपस्थित होते. तसेच तालुक्यातील अंतुर्ली, नरवेल धामंदे, खामखेडा, हरताळा, पिंप्राळा, कोऱ्हाळे, बेलसवाडी व इतर ठिकाणीही वृक्ष लागवड व संगोपन अभियानाअंतर्गत वृक्षलागवड करण्यात आली.