भुसावळ प्रतिनिधी । शहरातील शांतिधाम येथील श्री संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची 63वा पुण्यतिथी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून भुसावळ परिसरातील वरणगाव, पिंप्रीसेकम, दिपनगर, किन्ही, खडका, झे.ड.टी.सी, साक्री, फेकरी, कंडारी, येथील गोर-गरीब नागरिकांनी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन संत गाडगे बाबा अभियांत्रिकी महाविद्यालयमध्ये हिंदी सेवा मंडळ अध्यक्ष जगदीश अग्रवाल व शांतिधाम येथील महापूजा मंत्री मधुलता शर्मा यांचे हस्ते झाली. शहरात राष्ट्रसंत गाडगेबाबा महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक होते. दीनदलित आणि पीडितांच्या सेवेसाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य दिले. कीर्तनाच्या माध्यमातून ते लोक प्रबोधनाचे कार्य करायचे. त्यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले. स्वच्छता आणि चारित्र्याची शिकवण दिली, अशी माहिती हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी.अग्रवाल यांनी संत गाडगेबाबा यांचा 63वा पुण्यतिथी कार्यक्रमात दिली.
गाडगेबाबांना सामाजिक न्याय, सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांचा विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये मोठा सहभाग आहे. गोरगरीब, दीनदलित ह्यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चटन करण्यासाठी तळमळ असायची आणि त्यासाठी हे कार्यशील होते. त्यांनी दीन, दुर्बळ, अनाथ, अपंगांची नेहमीच सेवा केली आहे. आधुनिक महाराष्ट्रातील त्यांचे योगदान मोलाचे आहे, असे अग्रवाल म्हणाले.
याप्रसंगी हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषाध्यक्ष ॲड.एम.डी.तिवारी, एस.आर.गोडयाले, रमेश नागरणी व सर्व हिंदी सेवा मंडळ पदाधिकारी, प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे, सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.