पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा नगरपरिषदेतर्फे आज (9 ऑगस्ट) क्रांती दिनानिमित्त 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
त्यात सकाळी ७:३० ते ८:४५ या वेळेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची एम. एम. कॉलेज पासून आठवडे बाजार ते हुतात्मा स्मारक पावेतो “शहीद स्मारक सायकल रॅली” काढण्यात आली. त्यानंतर सकाळी ९ वाजता हुतात्मा स्मारक येथे हुतात्म्यांना वंदन करुन मगन राजाराम लोहार यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी शहरातील स्वातंत्र्य सैनिकांचे वारसांचा तसेच माजी सैनिकांचा मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला. त्याच प्रमाणे गांधी चौक भागातील हुतात्मा स्तंभ येथे सजावट करण्यात आली होती. याठिकाणी न. पा. कर्मचारी व सराफ असोसिएशन तर्फे शहिदांना मानवंदना अर्पण करण्यात आली.
यानंतर हुतात्मा स्मारक येथे वृक्षारोपण करण्यात आले. तद्नंतर नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी यांची हुतात्मा स्मारक ते राजे छत्रपती संभाजी चौक, शिवतीर्थ, रिंग रोडवरुन पुन्हा राजे छत्रपती संभाजी चौक पुढे एम. एम. कॉलेज पावेतो जनजागृती मोटरसायकल रॅली काढण्यात आली यात नगरपरिषद कर्मचारी तसेच इतर नागरीक देखील सहभागी झाले होते.
याच प्रमाणे दि. १३ ते १५ ऑगस्ट असे तीन दिवस “हर-घर-तिरंगा” अभियान राबविले जाणार असून दि. १३ ते ऑगस्ट २०२२ असे तीन दिवस देशातील प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवीणे बाबतचे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
यावेळी तहसिलदार कैलास चावडे, मुख्याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्कर, स्वातंत्र्य सैनिकांचे वारस, माजी सैनीक, उपमुख्याधिकारी दगडू मराठे, प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष व सदस्य, एम. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव वले व त्यांचे सहकारी शिक्षक वृंद, विविध शाळेतील विघार्थी, सराफ असोसिएशनचे पदाधिकारी आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. सी. एन. चौधरी यांनी केले.