यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाचा ४२ वा स्थापना दिन विविध कार्यक्रमांचे आयोजन करून येथे साजरा करण्यात आला.
यावेळी शक्ती केंद्रावर ध्वजारोहण करण्यात येवुन दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती यावल येथे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाईव्ह कार्यक्रमाचे प्रसारण दाखविण्यात आले. शहरातील प्रमुख मार्गावरून पक्षाच्या पदाधिकारी यांच्या वतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. सकाळी ९ वाजता गावात शहरातील शक्तिकेन्दातील चौकात भाजपाचे ध्वजारोहण करून भारत माताच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी १० वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लाइव्ह जनसंवाद माध्यमातून प्रक्षेपण करण्यात आले. या स्थापना दिवसानिमित्ताने भाजपा सदस्यता नोंदणी अभियान ही राबविण्यात आले. यात प्रत्येक कार्यकर्त्याने रोज १० असे एकुण १oo नवीन सदस्य नोंदणी करण्यात येवुन सामुहिक राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले.
याप्रसंगी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे, तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत, माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षल गोविंदा पाटील, यावल नगर परिषदचे माजी नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे, जिल्हा परिषदच्या मावळत्या सदस्या सविता भालेराव, पंचायत समितीच्या मावळत्या सभापती पल्लवी चौधरी, उपसभापती योगेश भंगाळे, युवा मोर्चाचे सागर कोळी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण चौधरी, पंचायत समितीचे मावळते गटनेते दिपक अण्णा पाटील, कृउबाच्या संचालक सौ कांचन फातक, भाजयुवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष राकेश फेगडे, भाजपाचे शहराध्यक्ष निलेश गडे, सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, ओबीसी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष बाळु फेगडे, कृउबाचे माजी संचालक नागेश्र्वर साळवे, व्यंकटेश बारी, रितेश बारी, स्नेहल फिरके, देवीदास धांगो पाटील, शहर उपाध्यक्ष राहुल बारी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
यावेळी आजी-माजी सैनिक/परिवार, ज्येष्ठ कार्यकर्ते, नागरिक, प्रबुद्ध नागरिक यांचा सन्मान करण्यात आला. पक्षाच्या वतीने सायंकाळी नागरिक स्नेह मिलन कार्यक्रम, सत्यनारायण पूजा, भारत माता पूजन, प्रसाद वाटप, रसपान तसेच लोकप्रीनिधींनी मतदारसंघात तसेच तालुक्यातील गावात १००% गावात, शक्तिकेंद्रात कार्यक्रम नियोजन करण्यात आले आहे.