धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । संत शिरोमणी रविदास महाराज यांच्या ६४८ व्या जयंतीनिमित्त धरणगाव शहरात राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. बुधवारी १२ फेब्रुवारी सकाळी ११ वाजता बसस्थानक परिसरातील संत रविदास महाराज यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी समाज बांधवांसह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून महाराजांच्या विचारांचा जागर केला.
धरणगाव शहरातील चर्मकार समाज बांधव मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते. संत रविदास महाराज यांच्या स्मृतींना वंदन करताना त्यांचे आदर्श विचार आणि समाज सुधारणा कार्य यावर उपस्थित मान्यवरांनी प्रकाश टाकला. त्यांच्या शिकवणींमुळे समाजात समानता आणि बंधुतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
या अभिवादन सोहळ्याला आर. एन. महाजन, डी. आर. पाटील, भानुदास विसावे, संजय महाजन, पप्पू भावे, विलास महाजन, चंदन पाटील, कन्हैया रायपूरकर, दिलीप महाजन, धनराज सोनवणे, गुलाब मराठे, बालू जाधव, राहुल जैन आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच, चर्मकार समाजाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाघ सर, शहराध्यक्ष धर्मराज मोरे, तुकाराम बेंडाळे, संतोष लेंडाईत, विकास मोरवकर, मयूर मोरावकर, संजय बंसी हरिवंशी यांनीही कार्यक्रमात सहभाग घेतला.