फैजपूर येथे पांडुरंग रथयात्रा महोत्सवनिमित्त विविध कार्यक्रम

programs

फैजपूर प्रतिनिधी । शहरातील ऐतिहासिक नगरीत संत श्री खुशाल महाराज देवस्थानचा अखंडीत 171वा स्वयंभू पांडुरंग रथयात्रा महोत्सव येत्या 12 नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी संपन्न होत आहे. यानिमित्त दि. 8 ते 17 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन उत्सव समितीद्वारा करण्यात आले आहे.

हा रथोत्सव भव्यदिव्य आणि समाजाभिमुख होण्यासाठी शहरवासींनी नुसते भाविक श्रोते होण्यापेक्षा तन-मन-धनाने या स्वयंभू पांडुरंग रथोउत्सवाला सहकार्य करावे, असे आवाहन महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी संत श्री खुशाल महाराज देवस्थान येथे सोमवारी घेतलेल्या रथोउत्सव पत्रकार परिषदेमध्ये केले. पुढे जनार्दन महाराज यांनी सांगितले की, आपली फैजपूर नगरी ही संस्थाची पावन भूमी म्हणून ओळखली जाते. त्यातच या शहरात स्वयंभू पांडुरंग रथोउत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तसेच लवकरच या मंदिराचे जिर्णोद्धाराचे काम मंजूर झाले असून बांधकाम सुरू होणार आहे. तसेच नागरिकांनी रथमार्गावर मोठ्या प्रमाणावर रांगोळ्या काढून रथाचे स्वागत करावे. तसेच ज्यांना कुणाला अल्पोहार ठेवणे शक्य असेल त्यांनी ठेवावे, असे देखील यावेळी महाराजांनी सांगितले.

अशी असणार कार्यक्रमांची रूपरेषा
दि. 8 ते 11 नोव्हेंबर रोजी नाम संकिर्तन सोहळा रात्री 8 ते 10 दरम्यान होणार आहे. जसे दि.8 रोजी ह.भ.प. आनंदा महाराज मोताळा, दि.9 रोजी ह.भ.प. दिलीप महाराज शेगाव, दि.10 रोजी ह.भ.प. रामेश्वर महाराज, दि.11 रोजी ह.भ.प. गोविंद महाराज पुण्यतिथी सोहळा निमित्त सकाळी 8 ते 9 वाजे दरम्यान अभिषेक आणि रात्री ह.भ.प. मोहन महाराज उस्मानाबाद यांचे संकीर्तन सोहळा होणार आहे. दि.12 नोव्हेंबर रोजी कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा स्वयंभू पांडुरंग रथयात्रा मिरवणूकीचा प्रारंभ होईल आणि दुपारी 3 वाजता महाआरती लोकप्रतिनिधी हस्ते, सुभाष चौक येथे होणार आहे. दि.13 नोव्हेंबर रोजी श्री विठ्ठल रुखमिनी यांची पालखी यात्रा मिरवणूक रात्री 7 ते 11 निघणार आहे. आणि दि.14 रोजी पालखी मिरवणूक दुपारी चार वाजता निघणार आहे.

आवाहन आणि उपस्थिती
या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा शहर आणि पंचक्रोशीतील वारकरी संप्रदाय यांच्यासह भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घेण्याचे आवाहन रथ उत्सव समिती फैजपूर यांनी केले आहे. या पत्रकार परिषदप्रसंगी ह.भ.प. प्रविणदास महाराज, खुशाल महाराज यांचे पाचवे वंशज, ह.भ.प. पुंडलिक महाराज, मेहुल भावसार, पांडुरंग सराफ, यादव भारंबे, नंदकिशोर सोमवंशी, सुनील गोवे, शालीग्राम पाटील, गिरीश नेमाडे, ऋषिल गोवे, जयेश राणा, नवल सरोदे, जयश सरोदे, संतोष तांबट आणि आत्माराम भोंबे यांच्यासह आदि उपस्थित होते.

Protected Content