खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात विविध कार्यक्रम

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील खिरोदा येथील अध्यापक विद्यालयात  जनता शिक्षण मंडळ व समता फाऊंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ई-श्रमकार्ड, आयुष्यमान भारत योजना व नेत्र तपासणी युवानेते धनंजय चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यालयात आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमात धनंजय दादा यांनी आपल्या मार्गदर्शनिय भाषणात सांगितले की, छात्र अध्यापकांनी करिअर करीत असतांना आपल्या कुंटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. बऱ्याच योजना सामान्यांपर्यंत पोहोचत नाही म्हणून या समता फांऊंडेशन च्या माध्यामातून समाजापर्यंत पोहचवता याव्यात हा एक प्रयत्न केलेला आहे. अध्यक्ष म्हणून मेनका चौधरी होत्या. समता फाऊंडेशनचे अतुल महाजन यांनी सरकारी योजनां विषयी माहिती दिली. या शिबिराचा लाभ छात्रध्यापकांनी व पालकांनी घेतला. कार्यक्रमाचे आयोजन नियोजन प्राचार्य डॉ. प्रतिभा बोरोले यांनी केले. सुत्र संचालन प्रा. हेमांगी चौधरी यांनी केले. आभार प्रा.पी .पी .चौधरी यांनी मानले.

 

Protected Content