Home Cities जळगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत मतदार याद्यांसह विविध विषयांवर उहापोह

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा बैठकीत मतदार याद्यांसह विविध विषयांवर उहापोह


जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाची जिल्हा कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांची व तालुका अध्यक्षांची जिल्हा बैठक मंगळवारी (८ ऑक्टोबर ) पार पडली. ही बैठक जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, प्रदेश सचिव रवींद्र भैय्यासाहेब पाटील व खोडपे सर यांची प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदार यादीतील दुबार नावे, वगळलेली नावे, नवीन जोडलेली नावे यांच्यावर हरकती घेण्यासाठी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. सर्व तालुका अध्यक्षांना वरील हरकतींसाठी अभ्यासपूर्वक तयार केलेल्या याद्या देण्यात आल्या. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रत्येक तालुकास्तरावर या संदर्भातील हरकती घेण्यात येतील. अत्यंत चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या मागील विधानसभेच्या याद्यांमधील घोळ हा या बैठकीत मांडण्यात आला.

सर्व तालुक्यांमध्ये तालुका निरीक्षक या बैठकीत नेमण्यात आले आहे. या बैठकीला जिल्हा समन्वयक विकास पवार, जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन सर, महिला अध्यक्ष मंगला पाटील, कार्याध्यक्ष राजेंद्र चौधरी व कार्याध्यक्ष संग्राम सिंह सूर्यवंशी, युवा जिल्हाध्यक्ष विश्वजीत पाटील, प्रदेश पदाधिकारी उमेश पाटील व रमेश बहारे, विकास पाटील, कल्पिता पाटील, सर्व तालुकाध्यक्ष, तालुका निरीक्षक उपस्थित होते.

 


Protected Content

Play sound